एपीएमसी बद्दल

कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर. या समितीची स्थापना दि.०१/०६/१९५५ झाली असून प्रत्यक्ष कामकाज सुरवात दि.३१/०३/१९५८ साली झाली आहे.याचा फायदा तालुक्यातील शेतकरी व तालुक्याबाहेरील शेतकरी वर्ग व व्यापारी वर्गाला खूप झाला आहे. समितीचे उद्दिष्टे शेतकऱ्यांना शेती मालाला चांगला बाजार भाव मिळून देऊन त्यांचा आर्थिक स्तर सुधारण्याचे आहे. त्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती पाथर्डी यांनी शेतकऱ्यांना शेती माल विकण्यासाठी भव्य असे बाजार आवार उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल चालते. शेतकऱ्याला व्यापारी वर्गाकडून मालाला योग्य भाव मिळून दिला जातो.

कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव चे वैशिष्ट्ये

  • शेती मालाची खुल्या लिलावाने विक्री व स्पर्धात्मक बोली लाऊन जास्तीत जास्त बाजार भाव शेतकऱ्यांना मिळवून दिला जातो.
  • बाजार समितीचे अनुज्ञप्तीधारक मापारी यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारे अचूक मोजमाप.
  • विद्युत व्यवस्थेसाठी सौरपॅनल/इन्व्हर्टर व्यवस्था.
  • शेतमालाच्या व्यवहाराच्या तक्रारीची त्वरित दखल घेतली जाते.
  • सर्व सुखसोयीयुक्त बाजार आवार.
  • शेतीमालाचे अचूक वजन करण्यासाठी आडते, व्यापारी व शेतकऱ्यांकरिता मुख्य व उपबाजार आवारात ८०व ५०मे. टनी भुई काटा दिवस-रात्र उपलब्ध.
  • बाजार आवारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या रक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे.
  • बाजार भाव प्रदर्शित करण्याकरिता बाजार आवारात एलईडी डिस्प्ले व स्टिकर बोर्ड.
  • शेतकऱ्यांसाठी अल्पदरात भोजन व्यवस्था.
  • शेतकऱ्यांसाठी निवासासाठी शेतकरी भवन व्यवस्था
  • हमाली व मापाडी यांना विश्रांती करिता हमाल भवन व्यवस्था
  • शेतकरी,हमाल मापाडी,व्यापारी व इतर घटकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
  • उप बाजार बोधेगाव येथे शेतकर्यांच्या मालाच्या प्रतवारी साठी धान्य चाळणी व्यवस्था
अ.क्र माहिती तपशील
बाजार समितीची स्थापना तारीख दि.०१/०६/१९५५ झाली असून प्रत्यक्ष कामकाज सुरवात दि.३१/०३/१९५८ साली झाली आहे.
बाजार क्षेत्रात समाविष्ट तालुक्याचे नाव संपूर्ण शेवगाव तालुका
समाविष्ट एकूण गावांची संख्या ११२
पैकी बाजार क्षेत्रात समाविष्ट गावांची संख्या ११२
बाजार ज्या गावी आहे त्या गावांची नावे मुख्य बाजार शेवगाव उप बाजार बोधेगाव उप बाजार बालमटाकळी उप बाजार शिरूर टाकळी
बाजार जाहीर झाल्याची अधिसूचना तारीख ३१/०३/१९५८ १४/०१/१९७४ १२/०८/१९६९ ०५/०१/१९८३
बाजार समितीस स्वतःची इमारत आहे काय? होय होय होय होय
जनावरांचा बाजार आहे काय होय होय नाही नाही
बाजार स्वतःच्या मालकीचा आहे काय होय होय होय होय
१० असल्यास त्याचे क्षेत्रफळ (हे.आर) मध्ये ६.५२ २.७५ २.६० २.००
११ नियमांनुसार वस्तूची यादी ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, मठ, मुग, तूर, हुलगा, कापूस, तील, जवस, वरई, चवळी, भुईमुगशेंगा, शेंगदाणे, गूळ, सरकी, बैल, म्हैस, गाय, रेडा, शेळी, मेंढी, कोंबडी, अंडी, चामडी, लोकर, भात, आंबाडी, एरंडी, ताग, सुर्यफुल, कांदा, लसून, पालेभाज्या चिंच, गवत, वैरण, लिंबोळ्या व इतर