मार्केट

कापूस मार्केट

कृषी उत्पन्न बाजार समिती च्या कार्यक्षेत्रामध्ये जीनिग व प्रीसिंग आहेत त्या ठिकाणी कापूस हंगामात बाजार समितीच्या नियंत्रणाखाली भारतीय कपास निगम व जिंनिंग व्यापारी यांच्या माध्यमातून कापूस खरेदी केली जाते.

कांदा मार्केट

कांदा मार्केट बाजार समिती शेवगाव आवार या ठिकाणी सोमवार,गुरुवार शुक्रवार या वारी भरवला जातो व या साठी विक्रेता व खरेदीदार यांना सर्व सोयी सुविधा ह्या बाजार समितीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत .

जनावरे मार्केट

हा बाजार आठवड्यातून एकदा रविवारी मुख्य बाजार समिती शेवगाव व उपबाजार बोधेगाव येथे गुरुवारी भरवला जातो. व या दिवशी मोठ्या प्रमाणात बैल,गायी,म्हशी यांची खरेदी विक्री होत असते या साठी सर्व सोयी-सुविधा बाजार समिती शेवगाव मार्फत पुरवल्या जातात व हा बाजार-बाजार समिती शेवगाव यांच्या नियंत्रणाखाली चालतो.

भुसार मार्केट

भुसार बाजार हा आठवड्यात सर्व दिवस खरेदी/विक्री साठी मुख्य बाजार समिती शेवगाव व सर्व उप बाजार समिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलें आहे.या बाजार अंतर्गत धान्य,कड धान्य, कापूस व इतर हंगामी भुसार माल खरेदी/ विक्री व्यवहार रोजच्या रोज बाजार समिती शेवगाव यांच्या नियंत्रणाखाली चालतो.